राष्ट्रसंताच्या भक्ती स्थळाचा सर्वांगीण विकास करणार – ना. नितीन गडकरी
अहमदपूर (एल.पी.उगिले) : राष्ट्रसंत परमपूज्य डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य मला जवळून माहिती असल्याचे सांगून स्वातंत्र्यलढ्यात पंजाबच्या प्रांतामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे कार्य केलेले असल्याचे सांगून त्यांच्या सामाजिक, धार्मिक, कार्याची पताका महाराष्ट्र , कर्नाटक ,तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये पसरली आहे .म्हणूनच राष्ट्रसंताच्या भक्ती स्थळाचा केंद्र शासनाच्या वतीने सर्वांगीण विकास करणार व भक्ती स्थळ ते कपिलाधार महामार्गास श्री संत मनमत शिवलिंग पालखी मार्ग नाव देणार असल्याचे प्रतिपादन परिवहन भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आभासी पटलाच्याद्वारे उद्घाटन केले .
ते भक्ती स्थळ येथे राष्ट्रसंत प पू डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी मंदिर बांधकाम भूमिपूजन व द्वितीय संजीवन समाधी सोहळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री ना. डॉक्टर भागवत कराड, शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार रमेश कराड, आमदार रत्नाकर गुट्टे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील ,माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे ,भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक , माजी सभापती आयोध्याताई केंद्रे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, भक्ती स्थळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील, सचिव सुप्रियाताई घोटे , दत्ता खंकरे, शिवा संघटनेचे उमाकांत शेटे, शिवा संघटनेचे धन्यकुमार शिवणक भक्ती स्थळाची बाबुराव देशमुख एडवोकेट कोथळे, शिवप्रसाद पुरे, मनमत आप्पा पालापुरे, रतिकांत स्वामी तोंडारकर, चंद्रकांत हैबतपुरे, शंकर स्वामी, शिवलिंग पाटील कीनीकर , बाबुराव धूळशेटे, बालाजी शिवपुजे, कैलास जामकर, संगमेश्वर बिराजदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री नामदार भागवत कराड म्हणाले की, मनमत स्वामी यांच्या कार्याप्रमाणे राष्ट्रसंताचे कार्य सबंध महाराष्ट्राला माहिती असल्याचे सांगून त्यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीने भक्ती स्थळाला विकास निधी मोठ्या प्रमाणात देणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सभागृहासाठी वीस लक्ष रुपये, खासदार सुधाकर शृंगारे यांनी पन्नास लक्ष रुपये भक्ती स्थळाला विकासासाठी घोषित केले.
यावेळी शिभप भगवंतराव पाटील, शिभप शिवराज नावंदे गुरुजी ,माजी मंत्री विनायकराव पाटील ,खासदार सुधाकर शृंगारे यांचे मनोगतपर भाषणे झाली. धर्मसभेचा समारोप परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वाचनाने समारोप करून धर्मसभेची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार उटगे यांनी सूत्रसंचलन रामलिंग तत्तापूरे आणि आशा रोडगे यांनी तर आभार एडवोकेट किशोर कोरे यांनी मानले.
यावेळी प पू नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, प्रभूदेव शिवाचार्य महाराज माडेकर, शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनतपालकर ,संगनबसव महास्वामी निलंगेकर , आचार्य गुरुराज स्वामी महाराजअभिषेक गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हाडोळतीकर सह मान्यवर गुरुमाऊली ची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्रमुख ओमभाऊ पुणे, राजकुमार कल्याणे, विनोद हिंगणे, अनिल कासनाळे, सतीश लोहारे, शिवकुमार उटगे ,राहुल शिवपुजे, अभय मिरकले, रवी महाजन ,संदीप चौधरी, एडवोकेट किशोर कोरे, एड निखिल कासनाळे, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, संतोष चवळे, शिवलिंग पाटील, मनमत प्रयाग, विठ्ठल गुडमे, संतोष कोटलवार, अभिजीत पुणे सह भक्ती स्थळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.