कुमठा खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने बळीराजाचा सन्मान

कुमठा खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने बळीराजाचा सन्मान

उदगीर (एल.पी. उगीले) : पशुधन हे बळीराजासाठी दैवत आहे, संपुर्ण वर्षभर काम करून हे पशुधन समाजासाठी अन्नधान्य निर्माण करतात. वास्तविक पाहता आपण जरी हे सर्व बळीराजांनी निर्माण केल्या असे म्हणत असतो तरी, बळीराजाच्या या प्रयत्नाच्या पाठीमागे बैलांचा मोठा वाटा असतो. आजच्या घडीला काही श्रीमंत शेतकऱ्यांकडे अद्यावत यंत्रसामग्री आल्यामुळे बैल ठेवण्याऐवजी यंत्राच्या साह्याने जरी शेती केली जात असली तरी, शेतीला पूरक उद्योग धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गाई, म्हशी ठेवाव्याच लागतात.
यातूनच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचे मार्ग मोकळे होत आहेत या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आणि सर्वच शेतकऱ्यांनी पशुधनाची योग्य काळजी घ्यावी, शेतकऱ्यांना तशी प्रेरणा मिळावी असा उदात्त हेतू ठेवून उदगीर तालुक्यातील कुमठा ग्रामपंचायतच्या वतीने बळीराजांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ केंद्रे यांच्या संकल्पनेतून गेली दोन वर्षांपासून बैलपोळ्याच्या निमित्त शेतकऱ्यांच्या बैल, गाय, कारवड जे उत्कृष्ट आहेत, त्यांचे संगोपन ज्या शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने केलेले आहे ,अशा बळीराजांना प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायत कुमठा (खुर्द) च्या वतीने सन्मानचिन्ह व आर्थिक मदत केली जात आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीही गणेश उत्सवाचे औचित्य साधून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचा सन्मान करण्यात आला, यावर्षी उत्कृष्ट बैल जोडी पुंडलिक मारुतीराव केंद्रे यांची,तर द्वितीय उत्तम बाबुराव घुगे, गायी मध्ये प्रथम पुरस्कार प्रल्हाद जनार्दन सुवर्णकार, तर द्वितीय पुरस्कार इंद्रभान तुळशीराम फड,उत्तम कारवाडी मध्ये निवृत्ती गणपती तलवारे, गोरे जोडीमध्ये प्रथम रामराव काशिनाथ डिगोळे, द्वितीय मध्ये मनोहर व्यंकटराव मोमले, रेड्यामध्ये मोहन दादाराव जाधव, अशा उत्कृष्ट जनावरांच्या मालकांना त्यांचा सन्मान करून गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणरावजी पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील , काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्ता सुरनर, जावेद शेख, कुमठा गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुआण्णा बिरादार, अशोकरावजी केंद्रे, माधव बिरादार, तय्यब शेख, वैजनाथ डिगोळे , सय्यद पाशा, रवी बिरादार, रामदास जाधव,बळीराम केंद्रे, भागवत तलवारे, मुरलीधर रनक्षत्रे, बबन तलवारे, जीवन केंद्रे,मारोती घुगे,युवा गणेश मंडळ कुमठा खुर्द चे अध्यक्ष दीपक ज्ञानोबा जाधव, उपाध्यक्ष अतुल व्यंकटराव केंद्रे व मंडळाचे सर्व सदस्य, गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
गणेश मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन तुळशीदास जाधव यांनी केले.आभार संयोजक सुनील केंद्रे यांनी केले.

About The Author