तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात समर्थ विद्यालयाचे यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात समर्थ विद्यालयाचे यश

उदगीर (एल.पी. उगीले) : येथील श्यामार्य कन्या विद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या “साथी शेतकऱ्यांचा” या प्रयोगाने घवघवीत यश मिळवत, माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळाले आहे. साथी शेतकऱ्यांचा या प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक के. जी. हाळीघोंगडे यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी टाकाऊ वस्तूपासून काठी बनविली आहे. ही काठी रात्री, अपरात्री शेतातील कामे करताना उपयोगात येणार आहे.
ही काठी जमिनीवर ठेकवताच आवाज व कंपन होत असल्याने सापासारखे अनेक प्राण्यांपासून संरक्षण होणार आहे. तसेच यात वरच्या बाजूस लाईट ची व्यवस्था करण्यात आल्याने अंधारापासून मुक्ती ही मिळणार आहे. म्हणून ही काठी शेतकऱ्यांना किफायतशीर व उपयोगी पडणार आहे. विज्ञान शिक्षक के. जी. हाळीघोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका वर्षा कवडगावे, विद्यार्थी बबिता मुंडे, मोनिका भालके यांनी साथी शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दाखल केल्याबद्दल शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग नागेश मापारी, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे, प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण याच्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author