विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दयानंद शिक्षण संस्था कटिबद्ध – रमेशजी बियाणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दयानंद शिक्षण संस्था कटिबद्ध - रमेशजी बियाणी

दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला संस्थेच्या वतीने सत्कार सोहळा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या दयानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने नीट परीक्षेत उत्तुंग भरारी घेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखलेली आहे. या नीट परीक्षेत उत्तुंग असे यश मिळविलेल्या 652 गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आलेल्या निखिल नावंदर याच्यासह यश बिरादार, सागर सावंत, प्रणव गजभार, मयंक चंद्रात्रे, शुभम मलेश, आनंद राखोंडे, संस्कृती सेजल, ऐश्वर्या सूर्यवंशी, प्रीती पाटील आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने दि.१० सप्टेंबर 2022 रोजी यथोचित सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी होते.याप्रसंगी संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन,सी.ई.टी.सेलचे चेअरमन डॉ.चेतन सारडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाराम पवार, उपप्राचार्य डॉ.मिलिंद माने, पर्यवेक्षक डॉ.हेमंत वरुडकर, पर्यवेक्षक प्रा.उमाकांत झुंजारे, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, प्रा.बळवंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात कोविड काळात ऑनलाइन सर्वोत्तम शिक्षण देणारी दयानंद संस्था – रमेश बियाणी

याप्रसंगी संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सदैव प्रयत्नशील राहते.कोविड-19 च्या काळात संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्वोत्तम असे ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या दयानंद शिक्षण संस्था असून त्यांचा नावलौकिक राज्यभरात मिळवला असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही स्वरूपाचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.त्यामुळे हे घवघवीत यश महाविद्यालयाने संपादन केले आहे. वेळप्रसंगानुसार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शैक्षणिक सुविधा,तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांच्या माध्यमातून याही वर्षापेक्षा पुढच्या वर्षीचा निकाल सर्वोत्कृष्ट कसा येईल यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे बियाणी यावेळी म्हणाले.

दयानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या खंबीर पाठीशी – लक्ष्मीरमन लाहोटी

दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी लातूर शैक्षणिक पॅटर्न वृद्धिंगत करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या नेहमी पाठीशी आहे संस्थेने विविध महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुविधा उपलब्ध करून दिल्या असुन नेहमीच विद्यार्थ्याच्या खंबीरपणे पाठीशी संस्था राहिलेली आहे पुढेही राहील यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपप्राचार्य डॉ.मिलिंद माने यांनी प्रास्ताविकातून नीट निकालाचे वाचन करून महाविद्यालयातील विविध उपक्रम,प्रत्येक परीक्षेनंतर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून प्रश्नपत्रिकामधील शंकांचे निरसन, पूर्ण अभ्यासक्रमावरती घेण्यात आलेल्या 24 परीक्षा आणि 04 माॅक टेस्ट घेण्यात आल्या याचे हे फलित आहे असे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन प्रा.बळवंत सूर्यवंशी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक डॉ.हेमंत वरुडकर यांनी मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा.विजयकुमार मांदळे, डॉ.डी.एम.सूर्यवंशी, प्रा. प्रमोद माने, पी.व्ही.कुलकर्णी, सुधीर मुंडे, नितेश दुधभाते, महेंद्र कोराळे यांच्यासह आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

About The Author