सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्षपदी राम पाटील यांची तर सचिव पदी सुभाष गुंडीले यांचे बिनविरोध निवड

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्षपदी राम पाटील यांची तर सचिव पदी सुभाष गुंडीले यांचे बिनविरोध निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शासकीय विश्रामगृहामध्ये दसरा प्रेमी नागरिकांची व्यापक बैठक सार्वजनिक दसरा महोत्सव समिती च्या सन 2022 च्या अध्यक्षपदी राम पाटील यांचे तर सचिवपदी सुभाष गुंडीले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, पापा आय्या, नगरसेवक अभय मीरकले, शिवकुमार उटगे, प्रा. विशंभर स्वामी, रामलिंग तत्तापूरे, मानकरी बालाजी पाटील, जुगल शर्मा, माधवराव पुणे, गोविंद गिरी, राजकुमार कल्याणी, दयानंद घाटोळ, दयानंद पाटील सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.

उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे उपाध्यक्ष साईनाथ पाटील, ऋषिकेश गुट्टे, कोषाध्यक्ष संगम पाटील, सहसचिव अनिकेत काशीकर सदस्य सौरभ कुलकर्णी, विकास बोबडे, तुषार हंगरगे, ओंकार पुणे, तुकाराम लोकरे, जयराज तेलंग, किरण पाटील ,अभय कदम यां नूतन कार्यकारिणीचा सत्कार डॉ. अशोक सांगवीकर, मार्गदर्शक ओमभाऊ पुणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशांत भोसले, दत्ता गोरे, शैलेश जाधव ,पिंटू सूर्यवंशी, पांडुरंग लोकरे, नितीन धर्माधिकारी, योगेश शेटकार, राजकुमार गाढवे सह दसरा प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक सांगवीकर, ओमभाऊ पुणे, अभय मिरकले, माधव पुणे यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली .अहवाल वाचन माजी अध्यक्ष दयानंद पाटील यांनी सूत्रसंचलन प्रा. विश्वंभर स्वामी यांनी तर आभार रामलिंग तत्तापूरे यांनी मांनले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!