संत ज्ञानेश्वर विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा मीनाक्षी तोवर आणि प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ऍड. सुवर्णा महाजन, उपस्थित होत्या तसेच लीनेस क्लबच्या सचिव पुष्पा ठाकूर, कोषाध्यक्षा शिला घाटोळ, सदस्या अर्चना घाटोळ, वंदना केंद्रे, राजेश्री कोरनूळे, जनाताई शिंदे, ज्योती चव्हाण, संगिता पाटील उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून हिंदी दिनाचे महत्त्व हिंदी शिक्षिका अर्चना जांभळदरे यांनी सांगितले तसेच भानुदास माने सरांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी वर्ग 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून नाटिका, मुक अभिनय, गीतगायन, भाषण अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राजक्ता भोसलें मॅडम आणि सोनिका पवार यांनी उत्कृष्ट असं परीक्षण करून निकाल जाहीर केला विद्यार्थ्यांना लीनेस ग्रुप कडून बक्षीस देण्यात आले.तसेच बालाजी शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी दशेमध्ये जिद्द, चिकाटी, आणि मेहनत केली तर तुम्ही जीवनात नक्की यशस्वी होणार असे मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले आणि शाळेला त्यांनी बक्षीस सुद्धा दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्ग नववीची विद्यार्थिनी निवेदिता कोकणे हिने केले व आभार लिनेस ग्रुपच्या सदस्य अर्चना घाटोळ यांनी मानले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!