मराठवाडा मुक्ती दिनी उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन व विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. यावेळी वीरमाता ललिता चंद्रकांत कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक मन्मथप्पा चिल्ले, प्रभू डोईजोडे, वीरभद्रअप्पा मंडगे, गोरखनाथ बंडे, तुकाराम चामले, पंढरीनाथ तिरुके यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव ॲड.एस.टी पाटील व सहसचिव डॉ.आर.एन.लखोटिया, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, ॲड.अजय दंडवते, बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, सुभाष धनुरे, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे यांची उपस्थिती होती. चिल्ले यांनी मुक्तिसंग्रामातील आठवणी सांगितल्या. मंडगे यांनी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ललिता कुलकर्णी यांनी देशासाठी शहीद झालेल्या कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या विषयी माहिती दिली. समारोपात तिरुके म्हणाले मुक्तिसंग्रामाच्या रोमांचक इतिहासातून प्रेरणा घेऊन देशाच्या एकतेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी यांनी केले, प्रास्ताविक डॉ.बी.एम.संदीकर यांनी केले तर आभार प्रा.प्रसाद जालनापुरकर यांनी मानले.