महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील जागतिक ओझोन दिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागातर्फे जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जे.एम.पटवारी यांनी जागतिक पर्यावरण आणि त्या दृष्टीने ओझोनचे महत्त्व तसेच संरक्षण कवच म्हणून उपयोग याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.एस.कांबळे होते, त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वैयक्तिक भूमिका यावर प्रबोधन केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी ओझोन क्षय होणारे पदार्थ कमी वापरावेत, असे सांगितले. या कार्यक्रमात पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये मनियार मरियम, काळवणे ऐश्वर्या, मल्लिकार्जुन, संध्या अष्टुरे, प्रणाली कांबळे, पाटील श्रीहरी, हवाना शिवानी, पुनम गायकवाड आणि मोहीज परकोटे या विद्यार्थ्यांनी ओझोन क्षय यावर आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रामेश्वर व स्वप्ना केवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रणाली कांबळे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.आर.के.नारखेडे, प्रा.डॉ.पी.एस.शेटे, प्रा.नागपूर्णे, संतोष वाडकर, तुकाराम बेंबडे व सर्व पर्यावरण शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.भूगोल विभागातही जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विभागप्रमुख प्रा.डॉ.एम.पी.मानकरी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणशास्त्र विभागातील डॉ.आर.के.नारखेडे उपस्थित होते, त्यांनी जागतिक ओझोन दिनानिमित्त ओझोनचे होणारे क्षय आणि ओझोन वायूचे संवर्धन याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले, तसेच पुढे बोलताना ओझोनला पडलेल्या छिद्राविषयी सविस्तर माहिती दिली व त्यावर काय उपाय आहेत याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम.जे.कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीए तृतीय वर्षातील विद्यार्थी अनास परकोटे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु.नम्रता म्हेत्रे हिने करून दिला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी रुद्रानी शेट्टप्पा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ए.यू.नागरगोजे, प्रा.पी.डी.खटके,प्रा.रंगवाळ आणि बापूरे यांनी सहकार्य केले.