पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य लाभो – आ.कराड यांच्या हस्ते रेणुका मातेची महापूजा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य लाभो - आ.कराड यांच्या हस्ते रेणुका मातेची महापूजा

लातूर (प्रतिनिधी) : देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या मंदिरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते १७ सप्टेंबर २०२२ शनिवारी सकाळी महापूजा करण्यात आली.

जगातील लोकप्रिय नेते देशाचे विकास पुरुष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्ताने रेणापूर येथील रेणुका मातेच्या मंदिरात महापूजा करून त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. देशाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच देशभरातील लाखो, करोडो गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हातून या पुढील काळातही व्हावे उदंड आयुष्य उत्तम प्रकृती आणि मोठे सामर्थ्य लाभावे अशी अपेक्षा याप्रसंगी आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली.

यावेळी आ. रमेशआप्पा कराड साहेब यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, भागवत सोट, चंद्रसेननाना लोंढे, लातूर ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष अनिल भिसे, सेवा सप्ताहाचे जिल्हा संयोजक वसंत करमुडे, ओबीसी मोर्चाचे विभागीय संपर्कप्रमुख डॉ बाबासाहेब घुले, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे, राजकीरण साठे, सिद्धेश्वर मामडगे, विजय चव्हाण, महेश गाडे, उज्वल कांबळे, शंकर राठोड, अनुसया फड, महेद्र गोडभरले, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, राजकुमार आलापुरे, गोपाळ पाटील, काशिनाथ ढगे, गणेश चव्हाण, धनंजय म्हेत्रे, श्रीकृष्ण पवार, रमाकांत फुलारी, शालीक गोडभरले, प्रल्हाद फुलारी, ,मच्छिंद्र चक्रे, दिनकर राठोड, राजकुमार मानमोडे, श्रीमंत नागरगोजे, अच्युत कातळे, लखन आवळे, अंतराम चव्हाण, शेख अजीम, सुरज आकनगिरे, राजू आत्तार, रमेश वरवटे, नंदू बंडे, संगमेश्वर तत्तापुरे, शरद जाधव, रोहित खुमसे, रवी सुरकुटे, सचिन शिरसकर, दिलीप चव्हाण, नवनाथ बंडे, महादू राजे, संतोष माने, मकसूद शेख, विकी राजे, प्रशांत बंडे, दत्ता गवळी, बाबू राठोड, दीपक कातळे, धनराज कातळे, रफिक शिकलकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!