सहकार नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

सहकार नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील भाऊसाहेब थोरात संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सहकार नेतृत्व पुरस्कार लातूर येथील मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब नुकताच जाहिर झाला आहे त्याबद्दल आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूलगे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक शंकरराव बोळंगे, संचालक धनराज दाताळ, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, संचालक अशोक काळे, महेंद्र भादेकर, मुरलीधर दाताळ प्राध्यापक शशिकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!