शिरूर ताजबंद ते उदगीर डांबरीकरण व रुंदीकरण रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न !
उदगीर (एल.पी. उगिले) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे सतत पाठपुरावा करून शिरूर ताजबंद ते उदगीर हा मार्ग राज्य मार्ग म्हणून मान्यता मिळावी, तसेच या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी उदगीरचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी सतत पाठपुरावा केला होता, त्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला आहे.
हा मार्ग आता शिरूर ताजबंद ते उदगीर राज्य मार्ग क्रमांक २४९ च्या नावाने ओळखला जाईल,त्या रस्त्याचे डांबरीकरण व रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ आ. बाबसाहेब पाटील, माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मंचकराव पाटील, शिवानंद तात्या हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, सुरजभैय्या पाटील, माधवराव जाधव, मिलिंदराव महालिंगे, बळीराम भिंगोले, सिरोजोद्दीन जहागीरदार, बालाजी भोसले, बाबासाहेब हाळीकर, श्याम डावले, शिवाजीराव माने, विनायकराव पाटील चोबळीकर, बालाजी भोसले पाटील, वसंत शेटकार, तुळशीराम भोसले, रमाकांत भातीकरे, दीनानाथ राचमाळे, कोंडीबा पडोळे, इमरोज पटवेकर, गंगाधर ताडमे, अविनाश देशमुख, शामराव टीकोरे, सचिन पडिले, बालाजीराव जवळगे, बी.आर आंदे, नामदेव विराळे, रामप्रसाद जाजू, विजयकुमार येलमट्टे, बालाजी गुंडरे, अशिष तोगरे, बाळासाहेब बेंद्रे, सत्यवान भोसले, शिवाजी शेळके, जयपाल सिंग बयास, मुकुंदराव देशमुख, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, पत्रकार बालाजी तोरणे, पत्रकार बाबुराव श्रीमंगले, पत्रकार गणेश स्वामी, नारायण सूर्यवंशी, नारायण कानवटे, मल्लिकार्जुन स्वामी, अनिल लामतुरे, आनंद जाधव, उदगीर उप अभियंता देवकर जी, अहमदपूर उपअभियंता हत्ते जी, शाखा अभियंता कांबळे जी, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
