जिल्हा बँकेच्या आर्थीक पाठबळामुळे जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा – मारोती पांडे
जळकोट (एल.पी. उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जळकोट तालुक्यातील ३६ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकाच्या लागवड उत्पादन करण्यासाठी चालु आर्थीक वर्षात सुमारे ४३ कोटी रु वाटप करण्यात आले आहे. व यापूर्वी ४५ कोटी वाटप झाले होते. हे सर्व वाटपामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूरचे माजी पालकमंञी आ,अमितजी देशमुख , जिल्हा बँकेचे चेअरमन आ.धिरजजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स.न.२०२१-२०२२ मध्ये जळकोट तालुक्यात ३६ पैकी २४ वि.का, संस्था बँक स्तरावर १००% वसुली झाल्याबद्दल जळकोट येथे बँकेच्या सभागृहात तालुक्यातील संस्थेच्या चेअरमन व गटसचिव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या माजी चेअरमन शिलाताई पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे तालुका काँग्रेस चे अध्यक्ष तथा संचालक मारोती पांडे. नगराध्यक्षा सौ .प्रभावती कांबळे,जि.प.सदस्य बाबुराव जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, युवक काँग्रेस अध्यक्ष धनराज दळवे , सी.एम .कांबळे,सरपंच राजीव सगर,सरपंच संभाजी कोसंबे,सरपंच व्यकंटराव खटके. फिल्ड आँफीसर रामदास देशमुख .शाखा तपासणीस केंद्रे, मुसणे, डावळे,चेअरमन दिलीप पाटील,ज्ञानोबा मालुसरे,माधव बिरादार,मोहनराव लोहकरे,हाणमंत नागलगावे,विनायक केंद्रे ,हाशम सय्यद, अजित केंद्रे, पुंडलीक डावळे,माधव घुले, चव्हाण,श्रीहारी ढोबळे,उमांकात ईमडे, पुंडलीक पाटील, धोंडीराम बडे,माधव लांडगे,मनोहर गोंड,रामदास परीट,शंकर आगलावे, जिवबा पवार, संग्राम बाबळसरे,अमरजित पाटील, शेख नागरगोजे,व्यांकट केंद्रे, रांजेद्र गव्हाणे,बळीराम सोनटक्के ई.सर्व चेअरमन गटसचिव, नरवाडे, संगम कुलकर्णी, जमील मोमीन, नागरगोजे, बोटवे, तिलमिलदार.ई सह पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
