संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेत सेवा बजावून आल्याने महेश सास्तुरे यांचा स्वागत सत्कार
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या धाकटी वाडीचा सुपुत्र महेश तुकाराम सास्तुरे यांचा आफ्रिका खंडामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सैन्यात सेवा बजावून गावात परतल्याने गवकऱ्याच्या हस्ते जंगी स्वागत सत्कार.
भारत सरकार कडून दरवर्षी संयुक्त राष्ट्र सेना (शांती सेना ) म्हणून आफ्रिका खंडामधील मागास देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैनिक पाठविले जाते त्यामध्ये महेश तुकाराम सास्तुरे यांची निवड झाली होती. तर अतिशय दुर्गम परिसरात व धोकादायक स्थितीत सात महिने काम करुन गावी परतल्याने गावातील नागरिकांच्या वतीने त्यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. तसेच महेश यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विद्यालयांमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सत्कार करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना आफ्रिका खंडातील छोटे छोटे खंडाची माहिती, तिथली भोगोलिक परिस्थिती, त्या लोकांचा राहानीमान, तिथे रोज होत असलेला संघर्षाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली शांती सेना चे कार्य काय आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितले.
यावेळी गावचे सरपंच छायाबाई बुकले उपसरपंच शिवाजी सास्तुरे पोलीस पाटील मारुती सास्तूरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत बोकले जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक नागोराव पाटील तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड मुख्याध्यापक जयवंत मोरे शिक्षिका अश्विनी बिराजदार, सुनीता मुळजे शिक्षक जितेंद्र जाधव नितेश बोरुडे परमेश्वर शिंदे ओमप्रकाश घंटे शामराव बोकले तात्याराव शीतलगिरे आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
