स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज येथे फार्मसी दिवस रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज उदगीर येथे फार्मसी दिवस निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.सदर संस्थे मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबिर आयोजित करत विविध दिनविशेष सतत साजरे केले जातात.
उदगीर परिसरातील वाढती रुग्णसंख्या पाहता त्यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्याच्या अडचणी जाणवू नये म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुधीर जगताप हे सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करतात. याच अनुषंगाने स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रक्तपुरवठा व अडचणी आणि सामाजिक जाणीव याचे संस्कार व्हावेत, या कारणे सदरील शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सदरील शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि बहुतांश विद्यार्थी हे प्रथमच रक्तदान करताना दिसून आले. या शिबिरात बिडवे वैभव शिवशंकर,गवळे संदेश तुळशीदास,होनराव प्रकाश बालाजी,गणेश सुरेश तोलसरवाड,मोरखंडे विश्वनाथ काशिनाथ,उमाकांत वीरप्पा पवार,मंदाडे वैभव नाथराव,येणकिकर शंतनु सुनील,अनिल शिवाजीराव देसाई,पांचाळ योगीराज रमाकांत,माचेवाड राहुल नरहरी,इंदोरे जयदीप अमृत,सय्यद ताहेर मोहम्मद,संदीप मनोहर भालेराव,ऋषिकेश श्रीधर पदातुरे,विवेक विष्णुकांत वाकोडे,मुळे मारुती माधवराव,शेख इब्राहिम रियाज मिया,शेख साहिल सरवर,चैतन्य धनराज टिळे,कांबळे ज्ञानेश्वर रतन,बोरसे पाटील प्रणित सुभाषराव,रोहित पंडित बिरादार,महेश बाबुराव हुलसुरे,कदम सिद्धेश्वर माधव,साखरे ओमकार बाळासाहेब,शिंदे गंगाधर मदन,श्रीपाद संजीवनराव अहंकारी,मुल्ला शोएब सलीम पाशा यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे नियोजन विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी उदगीर चे प्राचार्य गणेश तोलसरवाड व शिक्षक,शिक्षकोत्तर कर्मचारी वृंदांनी केले.तसेच या शिबिरासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित नागप्पा अंबरखाने ब्लड बँक उदगीर च्या वतीने डॉ. शेटकार बसवराज,ओमकार गांजुरे,सचिन कोनाळे, अविनाश बिरादार,मोरे दत्ता,अंबुलगे संतोष यांनी सहकार्य केले.
