रंंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रयोग स्पर्धा

रंंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रयोग स्पर्धा

उदगीर (प्रतिनिधी) : रंगकर्मी साहित्य ,कला, क्रीडा प्रतिष्ठान उदगीर यांच्या वतीने भारतीय स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रयोग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मागील सात वर्षापासून आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, आरोग्य शिबिर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा लघुपट निर्मिती, पथनाट्यातून व्यसनमुक्ती , शासनाच्या विविध योजनांच्या प्रचारासाठी पथनाट्यतून जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी चिञकला ,निबंध लेखन स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात केले जाते.

विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकानाबरोबरच संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शन व प्रयोग स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले आसल्याची माहिती रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड यांनी सांगीतले. स्पर्धा दोन गटात ठेवण्यात आले आहेत प्रथम गट वर्ग 4 था ते 7 वा प्र पारितोषिक प्रथम 5075₹ निवृत्ती जवळे द्वितीय 3075₹ प्रा सिद्धेश्वर पटणे ,तृतीय 2075 ₹ प्रल्हाद येवरीकर , यांच्या वतीने तसेच दुसरागट वर्ग 7 वी ते 10 वी प्रथम पारितोषिक 5075₹ लक्ष्मण बेंबडे व मारोती लांडगे यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक 3075₹ ज्ञानेश्वर बडगे तृतीय पारितोषिक 2001 अभिजीत औटे यांच्या वतीने तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके 500 रुपयांचे दोन अभिजीत औटे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे. पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी गौरव चिन्ह व गौरवपञ देण्यात येणार आहे. तसेच सहभागी शाळा व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपञ देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम स्पर्धा सर्व माध्यामासाठी खुली आहे.सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना स्पर्धेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.बाजारातील रेडिमेड प्रदर्शनिय वस्तू सादर करता येणार नाहीत. ही शाळा व विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे ..प्रगोग मांडण्यासाठी{ प्रदर्शनासाठी} संयोजकाकडून टेबल उपलब्ध करुन देण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रु आहे .स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सकाळी १० :३० पर्यंत पोहचणे अवश्यक आहे .स्पर्धा दिनांक 2 ऑक्टोबर 2022 वार रविवार स्थळ शिवाजी महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर येथे करण्यात आले आहे .सहभागी होण्याचे आवाहन संपर्क प्र विभीषण मद्देवाड 9823160552 ,8830146861अध्यक्ष प्रतिष्ठान उदगीर सचिव प्रा ज्योती मद्देवाड , उपाध्यक्ष, मारोती भोसले , संदीप मद्दे सिद्घार्थ सुर्यवंशी , अॅड. विष्णू लांडगे, ॲड. महेश मळगे, रसूल पठाण, रामदास केदार, , महादेव खळूरे, लक्ष्मण बेंबडे, सचिन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल, निता मोरे, आश्विनी निवर्गी , विवेक होळसंबरे , अर्चना पाटील ,प्रा मोहसिन शेख, बालाजी भोसले ,टि डी पांचाळ ,नारायण कुंडले ,मारोती वाघमारे ,गजानन देवकत्ते ,हणमंत केंद्रे , रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!