वाढवणा पाटी ते किनी यल्ला देवी नवीन रस्ता निकृष्ट केल्याने अवघ्या सहा महिन्याच्या आतच उखडत आहे

वाढवणा पाटी ते किनी यल्ला देवी नवीन रस्ता निकृष्ट केल्याने अवघ्या सहा महिन्याच्या आतच उखडत आहे

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा पासुन जवळच असलेल्या वाढवणा पाटी ते किनी यल्लादेवी, चाकूर व लातुर ला जाणारा सर्वात शॉर्टकट रस्ता आहे. कमीत कमी 20 की मी अंतर कमी होत असल्यामुळे डिझेल, पेट्रोल ची बचत होते. म्हणुन वाढवणा पाटी ते किनि यल्लादेवी मार्ग चाकूर, लातुर जाण्यासाठी जवळ पडत असल्यामुळे अनेक अवजड वाहने तसेच अवैध वाळू चे टिप्पर ट्रक अवजड वाहणाची वर्दळ चालु आहे.

मात्र हा वाढवणा पाटी ते किनी यल्लादेवी डांबररोड बनवून वर्ष भर ही होत नाही,तोच खराब होत आहे. गुत्तेदार याने गिट्टी व डांबर कमी वापरल्यामुळे रस्ता उखडू लागला असुन खड्डे पडत आहेत. भेगा पडत असल्याचे दिसत आहे. अनेक ग्रामस्थ म्हणतात की हा अनेक वर्षा पासुन बनला नव्हता, मात्र आता बनला पण गुत्तेदाराने थातूर मातुर काम करून गिट्टी व डांबर कमी वापरल्या मुळे रस्ता आजू बाजूला भेगा पडत आहेत. अवैध वाळू टिप्पर व अवजड वाहने, ट्रक भरधावं वेगात धावताना दिसतात. त्या मुळे देखील रस्ता खराब होत आहे. याची योग्य चौकशी करून दोषी वर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

About The Author

error: Content is protected !!