“ब ” विभागीय अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ पुरुष स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचा संघ द्वितीय

"ब " विभागीय अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ पुरुष स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचा संघ द्वितीय

उदगीर (एल.पी.उगीले) : किनगाव येथे संपन्न झालेल्या अंतर महाविद्यालयीन “ब” विभागीय बुध्दिबळ स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचा संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या संघाचा नायक प्रतीक बेलसिंगे आणि स्वप्निल बोरोलकर यांनी खेळाचे चांगले प्रदर्शन केले. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे विभागीय स्पर्धेसाठी यांची निवड करण्यात आली.
क्रीडा संचालक प्रा.नेहाल अहमद यांचे खेलाडुंना मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .व्ही ए जाधव यानी खेलाडूंचा सत्कार केला. खेलाडुंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य ,पदाधिकारी , व सदस्य यांनी तसेच उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .विलास भोसले , पर्यवेक्षक प्रा जी जी सूर्यवंशी, प्राध्यापक , कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचार्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या .

About The Author

error: Content is protected !!