विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा – डॉ जितेंद्र शेळके

विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा - डॉ जितेंद्र शेळके

उदगीर (एल.पी.उगीले) : समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे विद्यार्थी हा अभ्यासपासून दूर जात असून सामाजिक मूल्यांचा देखील दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. काही वर्षांपूर्वी समाजमाध्यम हे माणसांच्या हाती होते तर आज माणूसच समाज माध्यमांचा हातचे बाहुले बनत चालला आहे. त्यामुळे समाज माध्यम आज समाज जीवनासाठी एक संकट बनत चालले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी समाज माध्यमाचा वापर जपूण करावा असे मत डॉ. जितेंद्र शेळके यांनी व्यक्त केले.

ते शिवाजी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित हिंदी सप्ताहाच्या समारोप समारंभात बोलत होते. अध्यक्ष म्हणून विचारपीठावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर. एम मांजरे ,हिंदी विभाग प्रमुख डॉ. भालेराव व्ही के, प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ. प्रणिता पाटील, प्रा. अनंत पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. शेळके यांनी माध्यमांमुळे आज माणसांचे जीवन असुरक्षित बनत चालले असून माणसांच्या जीवनावर विपरीत परीणाम होत आहेत, असेही प्रतिपादन केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना करियरवर लक्ष केंद्रित करून मोबाइलचा मर्यादित वापर करावा. तसेच भाषिक दृष्ट्या समृद्ध बनावे असा सल्ला दिला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेल्या साहित्य दर्पण या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निबंध व शुद्धलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.

डॉ व्ही. के. भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शरद पवार व ज्योती प्रजापती यांनी मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोसिम शेख तर आभार समीक्षा पाटील या विद्यार्थिनींने मानले. गोविंद पाटील व सतीश बापुरे यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!