ठाकरे कुटुंबीयाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेनेपासून बाजूला गेलेले रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे रामदास कदम यांचा जाहीर निषेध करून, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून, त्याचे दहन करण्यात आले. उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सदरील निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी या प्रसंगी सांगितले की, शिवसेने सोबत गद्दारी करून स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने रामदास कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आजपर्यंत शिवसेनेच्या बळावर मोठे झालेले रामदास कदम हे निर्लज्ज असून गद्दार आहेत. त्यांना सेना कदापी माफ करणार नाही. असे उद्गार व्यक्त केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख अरुणाताई लेंढाणे, शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष सचिन साबणे, माजी तालुकाप्रमुख कैलास पाटील, अंकुश कोनाळे, संभाजी ब्रिगेडचे राजकुमार माने, राजकुमार अतनुरे, व्यंकट थोरे, मनोज पाटील, प्रदीप पाटील मोरतळवाडीकर, अरुण बिरादार, शिवसेनेचे तालुका संघटक विष्णू चिंतलवार, अनिल पंचाक्षरी, उपशहर प्रमुख संजय मठपती, व्यंकट साबने, तातेराव जाधव, नितीन पाटील, ज्ञानेश्वर बिरादार, राजेश चव्हाण, दत्ता जाधव, रमाकांत मदने, गुरु कोरके, नितीन पाटील वंजारवाडी, महिला आघाडीच्या दिपाली भोसले, नंदा पांढरे, अर्चना उले, वच्छलाताई उले, श्वेता गायकवाड, लक्ष्मीताई जाधव, निर्मला गवारे, प्रियंका गडकर, संगीता गायकवाड, सुप्रिया गडकर, शिवकांता नागरगोजे, जयश्री बिजले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
