लॉयन्स क्लब उमंग क्लबच्या वतीने उदगीर शहर व परिसरातील 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

लॉयन्स क्लब उमंग क्लबच्या वतीने उदगीर शहर व परिसरातील 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले) : लॉयन्स क्लब उमंग या आंतरराष्ट्रीय क्लब च्या वतीने उदगीर शहर व परिसरातील उल्लेखनीय कार्य करून, स्वतःला झीजवून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणाऱ्या 25 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.लॉ.रामप्रसाद लखोटीया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथ मुडपे , नायब तहसीलदार संतोष गुट्टे , क्लबचे अध्यक्ष लॉ.विवेकचंद जैन, सचिव डॉ. भाग्यश्री घाळे, कोषाध्यक्ष लॉ.योगेश चिद्रेवार, प्रोजेक्ट चेअरमन लॉ.प्रा.सिध्देश्वर पटणे, आदर्श शिक्षक माधव मठवाले , आदर्श शिक्षिका सौ. आशाताई बेंजरगे , लॉ.कल्याण कपाळे, लॉ.अनिल कामण्णा, लॉ.डॉ.संदीप सोनटक्के, लॉ.विजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला मंचावरील सर्व मान्यवरांचा क्लबच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला. त्यानंतर लॉ.डॉ.भाग्यश्री घाळे, गुट्टे , मुडपे यांची यथोचीत भाषणे झाली. डॉ. लाखोटीया यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या वतीने 25 शिक्षकांना शाल, पुष्पगुछ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मंजुषा पाटील, प्रकाश मुळे, मीनाक्षी बिरादार, मधुमती बिरादार, माधव मटवाले, गुरुदत्त विजयकुमार महामुनी, विश्वजीत बालाजी श्रीखंडे, शेख अतीक लतीफ साब, नाझरीन बेगम सलीम साब, दायमी सय्यद आसरार अहमद राजा, दायमी सय्यदा फिरदोस, बुशरा नाजणीन युसुफ, दायमी सय्यद रहिमोदिन , ज्ञानोबा शिवाजी वाडीकर, आशा वसंतराव बेंजर्गे, मंगल राजू वाडकर, वर्षा अनिल जाधव, लीना गोटमुकले, राकेश पटवारी, महादेव कुंभार, रजनी पुदाले, कविता तरोडे, वैशाली संकाये, पटेल जहांगीर खान, गजानन पाटील या गुणवंत शिक्षकांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन तथा मुख्य आयोजक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्लबचे अध्यक्ष लॉ.विवेकचंद जैन यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!