ग्रामपंचायत मन्ना उमरगा अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ

ग्रामपंचायत मन्ना उमरगा अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते मौजे मन्ना उमरगा येथील ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला, त्यात जिल्हा परिषद शाळेतील पेवर ब्लॉक , आईच्या मंदिराची सुरक्षा भिंत तसेच अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची दुरुस्ती या कामांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. मनसेचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत उपसरपंच गुरूदत्त घोणसे यांच्या पुढाकारातून ही विकास कामे केली जात आहेत.

या शुभारंभ प्रसंगी सरपंच नवनाथ कांबळे, ग्रामसेवक शिवाजी चाटे, मनसे जळकोट तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिवशेटे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रामदास तेलंगे, शहर सचिव अमोल गाजरे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे , रोजगार तालुका अध्यक्ष लक्ष्मण लांडगे तसेच यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक चेअरमन आनंद बिरादार , रामकिशन कवडेकर,हंसराज पाटील,कैलास कवडेकर, किरण शिंदे, समाधान कवडेकर, अण्णाराव कांबळे, तानाजी वाडकर, सुग्रीव कवडेकर, तुळशीदास कवडेकर,मुरलीधर कांबळे, इत्यादी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!