भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे दांडिया महोत्सव – बाळासाहेब पाटोदे
उदगीर (एल पी उगिले) : भारतीय आदर्श संस्कृतीमध्ये विविध सण आणि उत्सव मानवी जीवनात आनंदाची उधळण करण्यासाठी ठेवलेले आहेत. ते त्याच उत्साहाने साजरी केले जावेत. या उद्देशाने उदगीर येथे राधासाई दांडिया महोत्सव दुधीया हनुमान शेजारी दूध डेरी येथे घेण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा 30 सप्टेंबर, एक ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, तीन ऑक्टोबर या चार दिवसात संपन्न होणार आहेत.
ज्या तरुण-तरुणींना दांडिया महोत्सवामध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी मोफत दांडिया प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे. दांडिया महोत्सवाचा प्रशिक्षणाचा कालावधी दोन दिवस ठेवण्यात आला असून अठ्ठावीस आणि 29 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी केले आहे.
सदरील दांडिया महोत्सवासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे आणि भाजपाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव हे असल्याचीही माहिती त्यांनी दिली. आयोजन समितीमध्ये बाळासाहेब पाटोदे, अभिजीत औटे, श्याम ठाकूर, सतीश पाटील हे असून मुख्य प्रशिक्षक म्हणून सुनील कोळी, ललिता पंडिया, श्रद्धा कोळी या मार्गदर्शन करणार आहेत.
या दांडिया महोत्सव उत्सवासाठी सल्लागार म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील, साईप्रकाश पारसेवार, मनोज दादा पुदाले, श्रद्धा जगताप, उत्तरा कलबुर्गे, दिपाली औटे, ज्योती डोळे, मीरा चंबुले, डॉक्टर रेखा रेड्डी, स्मिता येरुळकर, ऐश्वर्या भालेराव, चारुशीला पाटील, मोहिनी अचोले, सुरेखा गिरी, ज्योती स्वामी, भाग्यश्री केंद्रे, नीता मोरे, नीलिमा पारसेवार, जयश्री हिंगणे, प्रीती मुक्कावार, सुनिता मोरे, पल्लवी मुक्कावार, श्रद्धा वट्टमवार, रवी हसरगुंडे, सुभाष नागठाणे, धनाजी मुळे, मोतीलाल डोईजोडे, कविता डोंगरगे, स्वाती गुरुडे, अश्विनी मानकरी, पूजा कप्पीकेरे, विश्वनाथ डांगे, व्यंकटेश वट्टमवार, सुनील बनशेकीकर, महेश जाधव, विक्रम माने, संदीप सोनटक्के, राघवेंद्र देशमुख हे राहणार आहेत.
या महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेल्या स्पर्धेसाठी महिला गटातून प्रथम येणाऱ्या गटाला प्रथम पारितोषक 3100 रुपये रोख, द्वितीय पारितोषक 2000, तृतीय पारितोषक अकराशे तसेच महिला वैयक्तिक प्रथम पारितोषिक दीड हजार रुपये, द्वितीय पारितोषक हजार रुपये, तृतीय पारितोषक 750 रुपये तसेच युवती गटातून बारा वर्षाच्या पुढील प्रथम पारितोषिक 2100 रुपये, द्वितीय पारितोषक पंधराशे रुपये, तृतीय पारितोषक अकराशे रुपये, युवती वैयक्तिक गटातून प्रथम पारितोषक एक हजार रुपये, द्वितीय पारितोषक साडेसातशे, तृतीय पारितोषिक पाचशे रुपये, चार पेक्षा जास्त महिला पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक 3100, द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये, तृतीय पारितोषक अकराशे रुपये, असे ठेवण्यात असल्याची माहिती याप्रसंगी संयोजन समितीच्या वतीने बाळासाहेब पाटोदे यांनी दिली आहे.
या दांडिया महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन मधुमती कनशेट्टे, सरोजा वारकरे, पुनम टाकळे, शिवगंगा बिरादार, अंजुषा उगिले, शशिकला चव्हाण, मंदाकिनी जीवने, संगीता नेत्रगावे, अनिता बिरादार, रेखा कानमंदे, सुप्रिया मठपती, सपना बजाज, मयुरी खंडाईत, पुनम मुळे, अश्विनी चामवाड, स्नेहा चनगे, मंजुषा कुलकर्णी, उषा माने, अनुराधा धोंड, जया काबरा, अनिता श्रीनेवार, शोभा आपटे, सरोजा बिरादार, ललिता झिल्ले, विनोद पदमगिरवार, अभंग जाधव, विकास मोरे, सुधाकर पंदीलवार, शिल्पा बंडे, मानसी चन्नावार, नीलिमा पेन्शलवार, मनोज गुरुडे, श्रीकांत खंदारे, निलेश बाहेती, राजकुमार महिंद्रकर, सोमशेखर चिल्लरगे, नवनाथ जोगी, ईश्वर समगे, सरस्वती चौधरी, सुरेखा नाईक, सुनिता पेन्सलवार, सुनिता बिरादार, चंचला हुगे, देवकी शेटकार इत्यादींनी केले आहे.
उदगीर शहरातील भव्य दिव्य अशा पद्धतीने शासकीय दूध योजनेच्या ठिकाणी या दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचा आनंद जनतेने घ्यावा. महिलांसाठी केवळ शंभर रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. असेही संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
