सामाजिक कार्यकर्ते संतोष मगर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील बोपला येथील एस. आर. युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोषजी मगर यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.

दि 21 सप्टेंबर रोजी लातूर ग्रामीण बोपला येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषजी मगर यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यामध्ये बोपला येथील मोलाली साहेब दर्गा येथे चादर चढवण्यात आली. व सहाय्यक पाटिल कल्याण बाबा मंदिर येथे आरती करण्यात आली. तसेच लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लातूर वृक्ष टीमचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, बी. आर. पाटील, राजश्री कांबळे, राहुल पाटील, आयुब सय्यद, सोनू पाटील, संभाजी मगर, सूनिल पाटील, वाल्मीक शिंदे, सुरज धोंड, प्रल्हाद हजारे, रहमान शेख, ऋषी काटे, युनूस शेख, राजू मगर, दीपक मगर, सागर मिरजे, संतोष जी मगर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
