रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ अहमदपूरात जोडे मारो आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहमदपूर येथील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना अहमदपूर तालुका यांच्यातर्फे रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका संघटक प्रा संतोष रोडगे यांनी केले आहे. ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला. त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील प्रा. संतोष रोडगे यांनी यावेळी दिला.
यावेळी चिंतामणी येवंदेग उप तालुकाप्रमुख तिरुपती पाटील लहू बालवाड संतोष आदाटराव नगरसेवक संदीप चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली देवकते शिवकुमार बेंद्रे कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले गजानन येणे सुरेश अंकुलगे नामदेव कोणे बिराडे मारुती श्रीराम कदम गणेश चव्हाण आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
