अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास ६ विषयाच्या एम. ए. पदव्युत्तर पाठ्यक्रम मान्यता

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास ६ विषयाच्या एम. ए. पदव्युत्तर पाठ्यक्रम मान्यता

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने चालू शैक्षणिक वर्षापासून बहि:स्थ पद्धतीने इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र या ६ विषयास पदव्युत्तर पाठ्यक्रम सुरू करण्याची मान्यता दिली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत असे की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महात्मा फुले महाविद्यालयातील गुणवत्ता व भौतिक सुविधांचे अवलोकन करून बहिस्थ पद्धतीने इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयात एम. ए. अभ्यासक्रमास मान्यता दिली असून, तशा आशयाचे पत्र विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलानी यांनी महाविद्यालयास पाठविले आहे. त्यानुसार चालू २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ने एम. ए. मराठी व हिंदी या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता दिली असून वरील विषयात अहमदपूर परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व बहि:स्थ पदव्युत्तर विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. अनिल मुंढे व सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!