सुनंदाबाई बिरादार यांना महात्मा फुले महाविद्यालयात श्रद्धांजली

सुनंदाबाई बिरादार यांना महात्मा फुले महाविद्यालयात श्रद्धांजली

अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाबाई बाबुराव बिरादार (वय ६२वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत असे की, कै. सौ. सुनंदाबाई बाबुराव बिरादार यांचे अल्पशा आजाराने दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजतादुःखद निधन झाले. त्या अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत बिरादार यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कै. सौ.सुनंदाबाई बिरादार यांच्या पश्चात पती बाबुराव बिरादार, एक मुलगा, सून, एक मुलगी, नात नातू असा परिवार आहे. यावेळी घेण्यात आलेल्या शोकसभेच्या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!