आद्य क्रांतिवीर राजे उमाजी यांची भव्य दिव्य जयंती साजरी

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी यांची भव्य दिव्य जयंती साजरी

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : याठिकाणी भारतमातेला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्याचे पहिले स्वप्न पाहणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 231 जयंती साजरी करण्यात आले. यावेळी जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात मोफत नेत्रतपासणी आवश्यक त्या रुग्णांना चष्मे वाटप, महिलांना साडी पाटप गोरगरीब कुटुंबांना अन्यकिट वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप आदी उपक्रम त्यात समावेश होते. हा कार्यक्रम आक्का फाउंडेशन निलंगा संयोजित व उमाजी उमापुरे युवा मंच,आणि बेरड बेडर समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव चव्हाण साहेब नरवीर उमाजी राजे समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर,तर व्यासपीठावर बसवकल्याण चे विद्यमान आमदार शरणुजी सलगर साहेब, महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य प्रमुख वक्ते लक्ष्मण हाके सर, जिल्हा परिषद चे माजी कृषी सभापती बजरंग दादा जाधव, शिवसेना नेते संतोष सोमवंशी साहेब, बाबा पाटील, जयंत कमिटीचे अध्यक्ष तथा निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती नागनाथ पाटील साहेब समाजाचे नेते शेषराव मंमाळे, सुरेश मंडले, पैलवान मॉन्टी चव्हाण, अन्य मान्यवर उपस्थित होते. सत्काराच्या उत्तराचा अनेकांनी आपले विचार मांडले तसेच उमाजी नाईक यांच्या कार्याची इतिहास व्यासपीठावर मांडले. त्यात प्रामुख्याने प्रास्ताविक कोंडवीरेसरांनी मांडले त्यात जयंती उत्सव बेडर समाज यांच्या काय काय अपेक्षा आहेत ते स्पष्ट केले व जयंती उत्सवाचे महत्व ही स्पष्ट केले. तसेच बेडर समाजाच्या व भटक्या-विमुक्त समाजाचे काय संकल्पना आहेत त्या मांडून हवे ते उपयोजना करण्याचे आव्हान केले, जिल्हा परिषदेचे माजी कुर्षीसभापती बजरंग दादा जाधव यांनी उमाजी नाईकाच्या कार्याचे कर्तृत्वाचे कौतुक केले.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी यांची भव्य दिव्य जयंती साजरी

महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य लक्ष्मणजी हाके साहेब त्याने आपल्या उदबोधक भाषणातुन बेरड बेडर समाज बांधवाच्या काय संकल्पना आहेत त्यांना कोणती गरज आहे हे सांगून त्याने जयंती महोत्सवातून सामाजिक सलोखा कसे घडते व समाज प्रबोधन कसे घडते हे सांगून समाजातून उपेक्षित घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले ओबीसी समाज बांधव त्यामध्ये बेडर बेरड समाजातील थोर महापुरुष आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे असे महान कार्य केले असता देखील हा समाज आज पर्यंत उपेक्षित का आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यासाठी आपण स्वतः सुधारण्यासाठी शिक्षण हे अति महत्वाचा आहे अशा या आपल्या समाजातील लोकांनी शिक्षण घेऊन एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच कर्नाटक राज्यातील बसवकल्यान चे आमदार शरणुजी सलगर साहेब यांनी हिंदी मराठीत कॅनडी भाषाच्या संगमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर रहावे, समृद्धी घडवावी, व शारीरिक संपत्ती जपावे, व्यसना पासून दूर रहावे असे आव्हान नवतरुण युवकांना यावेळी केले. आपल्याकडे असलेली ताकद, युक्ती, शक्ती, एकत्रित करून आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी लावावा असेही यावेळी त्यांनी म्हणाले. यानंतर नरवीर राजे उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब यांनी समाज संघटीत राहून आपला विकास साधून घ्यावा असे सांगताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो अशा उद्देशाने समाज घडवावे व प्रगती करून घ्यावे. समाज एकत्र झाल्याशिवाय आपला विकास होणार नाही असे ते म्हणाले. आपला उपयोग दुसऱ्या कुन्हाला होणार नाही यांची काळजी घ्यावे असे अनेक अडचणीवर, प्रश्नावर आपले विचार मांडले तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची नावे बटालियन सुरुवात करण्याची मागणी यावेळी केले. लवकरात लवकर उमाजी नाईकांच्या विकास मंडळ स्थापन करावी असे त्यांनी अनेक मागण्या केल्या, अखेरच्या टप्पात धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समाजाचे विगवेगळ्या मागण्या आहेत ते मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे मान्यवरांनी मांडलेल्या सर्व मागण्या मी सरकार पर्यंत घेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असे यावेळी खासदार साहेबांनी वचन दिले. कार्यक्रमाच्या अखेर महाप्रसाद वाटण्यात आले त्यानंतर सायंकाळी भव्यदिव्य रोषनाई पारंपरिक वाद्य ढोल-ताशांच्या गजरात शहरामध्ये राजेंच्या प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आले. हि जयंती यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष नागनाथ पाटील बालाजी पोंगाके संजय ईश्वरे निलेश उमापूरे, स्वप्निल सुरवंशी युवराज योगी चंद्रकांत उमापुरे, सायबा कानडे नामदेव मुंडले रवी कुमार बुकले बाळू उमापुरे,अन्य समाज बांधव परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!