अखेर आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश, उदगीर व जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्तांसाठी 68 कोटीचे अनुदान मंजूर

अखेर आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश, उदगीर व जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्तांसाठी 68 कोटीचे अनुदान मंजूर

उदगीर (एल पी उगीले) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा झाल्यानंतर प्रथम टप्प्यात शंखी गोगलगाय मुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागांमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघातून अत्यल्प अनुदान मिळाले होते. तर औसा आणि निलंगा तालुक्यात सर्वाधिक अनुदान मिळाले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसातून आणि महाविकास आघाडी कडून कडाडून विरोध झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या यादीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचा समावेश करून उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी 68 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

अशी माहिती माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती ऑगस्ट पासून आमदार संजय बनसोडे शासनाला वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून सांगत होते.

शंखी गोगलगायीचा नाही तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची नोंद कृषी कार्यालयाकडून करून तसा अहवाल दिल्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात उदगीर व जळकोट तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हे निदर्शनास आल्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी एकूण 68 कोटी 37 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.

या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच उदगीर विधानसभा मतदारसंघात पावसाची सततधर झाल्याने व अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे आणि शेतजमिनींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातची पिके तर गेलीच गेली, मात्र त्यासोबतच काही ठिकाणी जमिनी देखील खरवडून माती वाहून गेली आहे. काही ठिकाणी शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन देखील मोठे नुकसान झाले होते.

त्यानंतर सहा ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने उघडीत दिली होती. त्यामुळे उरली सुरली पिके देखील तीव्र उन्हामुळे करपून गेली. अगोदर अतिवृष्टी आणि त्यानंतर तीव्र ऊन अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला होता. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र हे सोयाबीन या पावसांच्या मनमानीमुळे हातचे गेले होते. त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आमदार संजय बनसोडे यांनी नुकसान भरपाई च्या संदर्भात पाठपुरावा केला होता.
तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले होते. तसा अहवाल कृषी विभागाकडून व महसूल विभागाकडून उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची माहिती कृषिमंत्री अब्दुलभाई सत्तार यांना दिली होती. तसेच आमदार संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडेही मागणी केली होती. उदगीर विधानसभा मतदारसंघातील पन्नास हजार दोनशे शहात्तर हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांना नुकसानी पोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती. त्यामुळे शासनाकडून उदगीर व जळकोट तालुक्यातील एकूण 68 हजार 677 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 68 कोटी 37 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहितीही आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.

चौकट
उदगीर तालुक्यासाठी ५१ कोटी अनुदान मंजूर

उदगीर आणि जळकोट तालुक्यात झालेल्या सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांना न्याय दिला जावा, म्हणून शेतकऱ्यांचे कैवारी, राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून उदगीर तालुक्यातील ३७५१८ हेक्टर क्षेत्रावरील 47 हजार 113 शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा कृषी खात्याचा अहवाल ही शासनाकडे सादर केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 51 कोटी दोन लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. तर जळकोट तालुक्यात सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे एकूण बारा हजार 758 हेक्टर क्षेत्रावरील 21 हजार 564 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 35 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!