जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूलचा झेंडा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा ता अहमदपूर ४९ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२१ – २२ डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल, लातूर या ठिकाणी भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध एकूण ३० शाळांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूलच्या विद्यार्थांनी स्मार्ट ट्रान्स्पोर्टेशन बाय युजिंग सोलार एनर्जी हा प्रोजेक्ट सादर केला होता. यामध्ये शाळेला पहिला क्रमांकचे पारितोषिक मिळाले.
यासाठी श्री. ऋतिक पोले सर व विज्ञान शिक्षक श्री. शुभम पोले यांच्या मार्गदर्शनाखाली इ. ८ वी मधील कु .यशश्री वारलवार, कु. माहीन सय्यद, कू. गोविंद नरवटे व कु. शिवराज शिंदे या विद्यार्थांनी वरील प्रोजेक्ट सादर केला व प्रथम क्रमांक पटकावला. या ऐतिहासिक विजयाची सुरुवात ४९ वे बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शनातून करून अनुक्रमे तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन जिंकून व आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रथम क्रमांक घेऊन यशाचे मोरपीस आणखीन एकदा शाळेने आपल्या शिरपेचात लावून घेतले आहे. यांच्या या घवघवीत यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेशदादा हाके पाटील, संस्थेच्या सचिव श्रीमती रेखाताई तरडे, संचालक श्री. कुलदीप हाके पाटील, संचालिका सौ. शिवालिका हाके पाटील, तसेच प्राचार्य सौ. रुत चक्रनारायण, व समन्वयक श्री. संभाजी सांगळे, शुभांगी सुर्यवंशी, हिना कुल्लूरकर, ओझा स्नेहा, ज्योत्सना स्वामी, अंजली बोधनकर, श्री. भरत कानवटे, श्री.मोसीन शेख, शिक्षकेतर कर्मचारी केशव तोंडारे,चंदा काडवादे,अंगद सुरनर, सुभद्रा महाजन, राहूल नरवटे,मारोती पोले तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी सहभागी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
