महात्मा फुले महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी हे होते. तर, मराठी विभागाचे डॉ. मारोती कसाब व रोहिदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ.अभिजीत मोरे, डॉ. संतोष पाटील, वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!