शिवसेना लातूर तालुका प्रमुख पदी राजकुमार सुरवसे यांची निवड

शिवसेना लातूर तालुका प्रमुख पदी राजकुमार सुरवसे यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, शिवसेना सचिव संजययी मोरे यांच्या आदेशानुसार, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी काकडे व जिल्हाप्रमुख ॲड. बळवंतभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यातील चिंचोली ब. येथील राजकुमार काशिनाथ सुरवसे यांची लातूर तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. त्यांच्या कामाची दखल घेऊन सदर निवड करण्यात आली. सुरवसे यांनी संगायो समितीच्या माध्यमातून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे. समितीच्या माध्यमातून गावोगावी जाऊन मोफत फॉर्म वाटप करून निराधारांना आधार दिला. नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून अनेक जनांच्या शस्त्रक्रियाही विविध संस्थांच्या सहकार्याने करून दिल्या. शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या व विविध सामाजिक समस्यांसाठी आंदोलन ही केले आहेत. या निवडीचे नियुक्ती पत्र लातूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. काकडे साहेब, जिल्हाप्रमुख ॲड. जाधव साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, सतिष देशमुख, ॲड. रोहीत गोमदे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सुर्यवंशी, जिल्हा कार्यालय प्रमुख संजय मुर्गे, सदाशिव गव्हाणे, विजयकुमार स्वामी, विजय कांबळे, ॲड. परवेज पठाण, मल्हारी तनपुरे, नितीन महाजन, अल्ताफ तांबोळी, सौरभ बुरबुरे, आकाश भालेकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!