उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अधिकृत ॲप चे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पतसंस्थेच्या जीबी मध्ये होणार – सर्जेराव भांगे

उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अधिकृत ॲप चे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पतसंस्थेच्या जीबी मध्ये होणार - सर्जेराव भांगे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.25 सप्टेंबर 2022 रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय कौळखेड रोड उदगीर येथे ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे यावर्षी माजी गृहमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या आमदार निधीतून 23 केंद्रांना संगणक प्रिंटर व झेरॉक्स मशीन या अत्याधुनिक साहित्याचे वाटप त्याचबरोबर उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अधिकृत ॲप चे उद्घाटन संजय बनसोडे व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. उदगीर, देवणी, जळकोट तालुका जिल्हा परिषद सहकारी शिक्षक पतसंस्था जिल्ह्यातील सर्वात मोठी स्वभांडवली पतसंस्था म्हणून उदयास आली आहे.

दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर यांच्या वतीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्वात जास्त लाभांश देणारी पतसंस्था म्हणून सहा लाख सतरा हजार एकशे दहा रुपयेचा धनादेश (617110 ₹) देऊन पतसंस्थेचे चेअरमन, सचिव, उपाध्यक्ष व संचालकांचा सन्मान करण्यात आला. ही अभिमानाची बाब आहे.

उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान सचिव कल्पक व दूरदृष्टी नेतृत्व असलेले सर्जेराव भांगे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे देवणी, उदगीर, जळकोट तालुका संपर्कप्रमुख आहेत. हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

पतसंस्थेचे बँकेमध्ये रूपांतर करण्यासाठी पहिली पायरी म्हणून कोअर बँकिंग प्रणालीला ओळखले जाते, ही प्रणाली ॲपच्या माध्यमातून चालू करून आपण पहिले पाऊल टाकलेले आहे. या ॲपचे अधिकृतरित्या उद्घाटन पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे. सदरील ॲप मध्ये आपण पतसंस्थेचे कर्ज खातं, शैक्षणिक लोन खाते ,आकस्मिक कर्ज खाते, दीपावली लोन खाते ,आरडी खाते म्हणजेच आवर्त ठेव, मुदत ठेव यासारख्या अनेक योजना आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहता येतात. सभासद बांधवांच्या नियमित एस एम एस येत नाहीत अशा अडचणी आता उद्भवणार नाहीत.

या सर्व सुविधा चालू करणारी लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात एकही पतसंस्था नाही. हे आम्हाला आपल्या सभासदांना अभिमानाने सांगावेसे वाटते. आपण ठेवलेला अतूट विश्वास आम्हाला काम करण्याची प्रेरणा देतो, आणि त्या प्रेरणेतूनच हे सर्व घडत गेले आहे. यापुढेही आपल्याला उत्तम उत्तम दर्जेदार सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपले सहकार्य नेहमी आम्हाला अपेक्षित आहे. हे सर्व कार्य करत असताना पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व संचालक देवणी, उदगीर, जळकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तिन्ही तालुक्याचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्रशाला मुख्याध्यापक व केंद्रीय मुख्याध्यापक व पतसंस्थेचे सर्व सभासद, सर्व शिक्षक संघटनेचे नेतेमंडळी यांनी अनमोल असे सहकार्य आम्हाला केलेले आहे. त्यामुळेच आम्ही हा टप्पा गाठू शकलो. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवणी चे सरचिटणीस रविकिरण बलुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!