उदगीर शहरातील आठ मज्जतीसाठी स्वच्छालय बांधकामासाठी 80 लाख रुपये चा निधी मंजूर
आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते कार्यारंभ आदेशाचे वाटप
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर मतदार संघातील अनेक विकासाची कामे करत असताना मोठ्या प्रकल्पावर काम करून दिलेला शब्द पूर्ण करत असताना सर्वसामान्याच्या गरजेच्या समस्येच्या अनुषंगाने शहरांमध्ये मुस्लिम बांधवांच्या मशिदीमध्ये शौचालय नसल्याचे बाब आमच्या मुस्लिम बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, आघाडी सरकारच्या काळामध्ये ही बाब मी प्रामुख्याने लक्षात घेऊन 80 लाख रुपये च्या निधी मंजूर केला व त्यामधून शहरातील आठ मशिदीसाठी सदरील निधीचे कार्यारंभ आदेश मज्जित कमिटीचे प्रमुख सदर यांच्याकडे सुपूर्द केले ,शहरातील उर्वरित मशिदीसाठी सुद्धा येणाऱ्या काळात शौचालय बांधकाम करून देण्याचा शब्द यावेळी दिला ,या कार्यक्रमाला दोन्ही प्रमुख मशिदीमध्ये सर्व मुस्लिम बांधव व मज्जित प्रमुख सदर उपस्थित होते.
