पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याच्या पुतळ्याचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याच्या पुतळ्याचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर व जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर व हटकर समाज बांधव असून त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला दाद देत, निवडणुकीपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उदगीर मध्ये बसवण्याचे आश्वासन दिले होते ,मागील दोन वर्षांमध्ये याबाबतचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपयेचा निधी मंजूर केला, व आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन अहिल्याबाई होळकर गार्डनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवडणुकीपूर्वी दिलेली वचनपूर्ती करण्याचा मनस्वी आनंद होत आहे येणाऱ्या काळामध्ये वचनपूर्ती पूर्ण करण्यासह विकासाचा शिल्लक बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना आ.बनसोडे यांनी दिले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श लहान मोठ्या व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याची जाणीव ठेवून समाजामध्ये वावरला पाहिजे. हीच भावना मनामध्ये बाळगून या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या कामाचा शुभारंभ केला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली आहे, म्हणून या पुतळ्याच्या शुभारंभ करताना मनस्वी आनंद होत आहे.असेही आ.बनसोडे यांनी या प्रसंगी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!