रेवते परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करून स्मरण दिवस साजरा

रेवते परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करून स्मरण दिवस साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील कै. सौ.सुमन नागनाथ रेवते व कै बस्वराज नागनाथ रेवते यांचा स्मरण दिवस रेवते परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करून साजरा केला.

बहुतांशी आप्तवासियांचे स्मरण दिवशी विविध नातेवाईक, मित्र परिवार यांना आमंत्रण देऊन भोजन व अन्नदान करून साजरे केले जातात,पण रेवते परिवार आपल्या आई कै. सुमन नागनाथ रेवते व परिवाराचे ज्येष्ठ सदस्य कै. बस्वराज नागनाथ रेवते यांचा स्मरण दिवस हा गेली काही वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून साजरे करतात.

राजेश्वरी हॉटेल चे व्यवस्थापन पाहणारे रेवते परिवार हा या दिवशी सर्व मित्र परिवार एकत्रितपणे रक्तदान करत, उदगीर परिसरातील रुग्णांना या आपल्या कार्याचा उपयोग व्हावा. याची काळजी घेत हे दिवस साजरे करतो.

या शिबिरात आनंद मुळजकर, ओमसिंग राजपूत,गणेश रेवते,विष्णूकांत पेठे,बिरादार अक्षय,बाळासाहेब चव्हाण,हंसराज पटेल,विष्णू सूर्यवंशी,वैभव भंडे,जितू चौधरी, कामन्ना प्रदीप,सोमनाथ बिरादार,अमोल उत्तरवार,सागर रेवते,अनिल सूर्यवंशी,मुकेश चव्हाण,विनायक रेवते,महादेव टवटेवार,सुधीर सारसर,माने शंभू,मोरे मनोहर यांनी रक्तदान केले.

विशेष विष्णूकांत पेठे आणि अनिल सूर्यवंशी यांचा आज आपला वाढदिवस या परिवारासोबत रक्तदान करून साजरे केला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजेश्वरी समूहाचे उद्योजक श्री राजेश उडप्पा यांचे हस्ते झाले. आणि उदगीर नगर परिषद नगरसेवक मनोज पूदाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वतेसाठी विनायक पाटील,अक्षय घोरपडे,महेश रेवते,ऋषी आडे,नरेंद्र रेवते,विजयकुमार रेवते,कृष्णा रेवते,गणेश रेवते,विनायक रेवते यांनी परिश्रम घेतले.

नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर चे बी टी ओ डॉ बस्वराज शेटकार यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. पी आर ओ ओमकार गांजुरे,अविनाश बिरादार,अनुराधा सोनटक्के,राजू ढोबळे,संतोष अंबुलगे यांनी रक्तसंकलानाचे कार्य केले.

About The Author

error: Content is protected !!