महात्मा फुलेंचे साहित्य समाज परिवर्तन करणारे आहे – डॉ. शिवाजीराव जवळेकर

महात्मा फुलेंचे साहित्य समाज परिवर्तन करणारे आहे - डॉ. शिवाजीराव जवळेकर

उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा फुले यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड अशासारख्या ग्रंथातून त्यांनी साहित्यात मोलाची भर टाकली आहे.महात्मा फुलेंचे साहित्य हे समाज परिवर्तन करणारे आहे. असे मत दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील मराठी विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजीराव जवळेकर यांनी व्यक्त केले.

ते शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी वांग्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी व राष्ट्रीय सेवा योजना दिन विशेषाच्या निमित्ताने सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाज या विषयावर बोलत होते. अध्यक्ष म्हणून विचारपीठावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर. एम मांजरे , प्रा. मोरे , अँड.अशोक शेल्हाळकर , मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. शिवाजीराव जवळेकर म्हणाले , महात्मा फुले यांनी परिवर्तनाचे बी टाकले. आज त्याचा महावृक्ष झालेला आहे. परिवर्तन हे एकदाच होत नाही, ते हळूहळू होत असते, असेही प्रतिपादनही त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या वतीने उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे म्हणाले महात्मा फुले यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यासोबतच सामाजिक कार्याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात रुजवण्याचे काम केलेले आहे .कार्यक्रमामध्ये मराठी वांङमय मंडळाचे उद्घाटन व राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.

मराठी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ . सुरेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ. नरसिंग कदम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा ए एस टेकाळे, प्रा सौ.एन एस केंद्रे मराठी विभागातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!