उदयगिरीच्या प्रणिता विभूतेची थलसेना शिबिरासाठी निवड

उदयगिरीच्या प्रणिता विभूतेची थलसेना शिबिरासाठी निवड

उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट प्रणिता विभूते हिची 14 ते 25 सप्टेंबर 2022 कालावधीत राष्ट्रीय पातळीवर झालेल्या थलसेना शिबिरासाठी दिल्ली येथे निवड झाली .राष्ट्रीय छात्र सेना संचालनालय, महाराष्ट्र या कार्यालयातर्फे तिची निवड झाली आहे. लातूर बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ले.कर्नल संतोष कुमार, सुभेदार मेजर दीपक कुमार, उदयगिरीचे एनसीसी कमांडर लेफ्टनंट प्रा.डॉ.राम साबदे यांनी मार्गदर्शन केले. यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!