महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय क्रॉस कंट्री 10 कि.मी.धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकानी विजेता

उदगीर (प्रतिनिधी) : दि. 23 व 24 सप्टेंबर 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड अंतर्गत कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब-विभाग क्रॉस कंट्री स्पर्धेत महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

महाविद्यालयाच्या संघाने सलग पाचव्यांदा ही कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. विजेत्या संघामध्ये गणेश सुरवसे, हनुमंत देवकर, हंसराज ढगे, अर्जुन पिंपरी, मारुती दंडे, किरण राठोड तसेच यात पुरुष वेयक्तिक स्पर्धेत हंसराज ढगे – प्रथम आला आहे. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतीष मुंढे आणि प्रा. रोहन येनाडले यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी व अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया व अ‍ॅड.एस.टी.पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. बी.एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!