दयानंद कला मध्ये राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा

दयानंद कला मध्ये राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा

17 ते 24 सप्टेंबर सप्ताह साजरा
लातूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त 24 सप्टेंबर 1969 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन तरुणासाठी व त्यांच्या व्यक्तीमत्वाला विकास करण्यासाठी सुरु केली. म्हणून 24 सप्टेंबर हा दिन राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त दयानंद कला महाविद्यालयात 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर हा सप्ताह साजरा करण्यात आला याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्रामाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये व्याख्यानमाला, व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता अभियान व तरुणामध्ये वाचन संस्क्रतीचा विकास व्हावा म्हणून खुले ग्रंथालय याचे उद्घाटन करण्यात आले. या सप्ताहाचा समारोप समारंभ राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन निमित्त महाविद्यालयात करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. रमेशजी बियाणी हे होते. या प्रसंगी त्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समाजाच्या उभारणीमध्ये महाविद्यालयीन तरुणाची मोठी भूमिका आहे. सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक करु शकतो. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकारसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाविद्यालयीन स्तरावरील महत्व त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्था नियामक मंडळ सदस्य श्री. सागर मंत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड रा.से.यो.चे मुख्य कार्यक्रमाधिकारी सुभास कदम उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. सुनीता सांगोले, प्रा. अनिल माळी, पर्यवेक्षक दिलीप नागरगोजे, प्रा. विकास कोमटवाड, प्रा. गुणाजी क्षीरसागर राष्ट्रीय सेवा योजनेचे 147 स्वंयसेवक व स्वंयसंचालन ऋषिकेश पवार यांनी केले तर आभार अभिषेक गुरमे यांनी मानले. कार्यक्रमाचा सेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!