विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान – प्रा.डॉ. रामकृष्ण बदने

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान - प्रा.डॉ. रामकृष्ण बदने

मुखेड (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजनेची सूरुवात २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून करण्यात आली.अकरावी,बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच त्यांचे योगदान राष्ट्रीय उभारणीसाठी महत्त्वाचे ठरावे या भावनेतून ही योजना सुरु करण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य हे कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या चाकावरून घेतले असून यूवकात गतिमानता,आठ आरे म्हणजे अष्टोप्रहर म्हणजेच चोवीस तास कार्यशीलता असावी असा आहे.रासेयोचे बोधवाक्य नॉट मी बट यू हणजेच मी माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे या प्रकारचे आहे. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उद्देश आहे. राष्ट्रीय सेवा योजना हे दोन प्रकारचे कार्यक्रम घेते. एक वर्षभरात नियमित कार्यक्रम घेतले जातात आणि दुसरे दत्तक घेतलेल्या गावात विशेष यूवक शिबीराचे आयोजन केले जाते.त्यातून विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक,भावात्मक व क्रियात्मक विकास घडवून आणला जातो.राष्ट्रीय सेवा योजना हे मानवी संवेदना विकसित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे.राष्ट्रीय सेवा योजनेत सेवावृत्ती वाढीस लागते. लेखन,भाषण व संवाद कौशल्य विकसित होते.माझ्या आयुष्यातही राष्ट्रीय सेवा योजनेचे खूप महत्त्वाचे योगदान राहिले आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना या योजनेत प्रवेश घेऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात महत्त्वाचे योगदान देते असे प्रतिपादन ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांनी प्रस्तुत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सेवा योजना व युवक ‘या विषयावर ्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना सांगितले की माझ्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार राष्ट्रीय सेवा योजनेने दिला आहे. पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापनापासून ते आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्याची दृष्टी हे राष्ट्रीय सेवा योजना आपणास देते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेत प्रवेशित झालं पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.अरुणा ईटकापल्ले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस .बाबाराव यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली तर आभार राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.शंकरय्या कळिमठ यांनी मानले.यावेळी इंग्रजी या विषयात नुकतीच विद्यावाचस्पती (पी-एच.डी) पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा.सौ.शिल्पा शेंडगे पाटील यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ. गुरुनाथ कल्याण यांनी करून दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वयंसेवक यांनी राष्ट्रीय सेवा योजना गीताचे गायन केले. तदनंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील रा.से.यो. सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ.महेश पेंटेवार,प्रा.डॉ. सुग्रीव क्षीरसागर,प्रा.सूभाष देठे, सर्व प्राध्यापक,राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक,स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!