शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर – आमदार बाबासाहेब पाटील

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर - आमदार बाबासाहेब पाटील

लातूर जिल्हा बँकेकडून चेअरमन-सचिवांचा सन्मानअहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीपासूनच आमदार बाबासाहेब पाटील यांच्या राजकारणाची खरी सुरुवात झाल्याचे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख जिल्हा बँकेत आल्यापासून जिल्हा बँकेची खरी भरभराट व आर्थिक स्थिती मजबूत झालेली आहे.शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती सुधारली पाहिजे, त्यांचे उत्पन्न अधिक वाढले पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बँकेने शंभर कोटी रुपये,शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दरावर पाच लाखापर्यंत चे कर्ज वाटप केल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तालुक्यातील शेतकरी सभासदांची शंभर टक्के वसुली केलेल्या विविध कार्यकारी संस्थांच्या चेअरमन व सचिवांचा यथोचित सन्मान करतेवेळी आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. हेमंतराव पाटील हे होते तर विचार पिठावर आमदार बाबासाहेब पाटील, चेअरमन शिवानंद हिंगणे, जि.प.सदस्य माधवराव जाधव, निवृत्तीराव कांबळे, उद्धवराव ईप्पर ,फील्ड अधिकारी रामदास देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की तालुक्यातील 70 पैकी 50 संस्थेने शंभर टक्के वसुली केली असून इतरांनीही यांचा आदर्श घेऊन पुढील वर्षी संस्था पूर्ण वसुलीची करण्याची अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले पीक कर्ज पाईपलाईन ट्रॅक्टर मळणी यंत्र यासह मागील त्या शेतकऱ्याला कर्ज देण्यात येत आहे याबरोबरच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठीही चांगल्या योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे त्यांनीही मन लावून चांगले काम करीत असल्याचे सांगितले.

सिद्धी शुगर साखर कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती चांगली होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती सुधारली की बँका सुद्धा कर्ज द्यायला आपोआप तयार होतात. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देणे, महिला बचत गट, शेतकरी गट यासह शेतकरी कुटुंबांना आधार देण्याचे काम जिल्हा बँक करीत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करून त्यांची चांगली प्रगती करायची असल्यामुळे शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत चे कर्ज शून्य टक्के व्याजदराने बँक देत असल्याचे सांगितले. सोसायटी ही राजकारणाचा अड्डा न होता तो विकासाचा झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांनी आपले योग्य नियोजन करावे, शेतीमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे असून कामापुरते कर्ज काढावे अन्यथा याचा मुलाबाळांना त्रास होतो. शेतकऱ्यांनी निरव्यसनी व आनंदी राहावे, बँकेचा व्यवहार चांगला ठेवावा असा शेवटी सल्ला दिला.

अध्यक्षीय समारोप करतेवेळी अॅड.हेमंतराव पाटील म्हणाले की चेअरमन हे शेतकऱ्यांची, जनतेची मनोभावे सेवा करीत असतात. लातूर जिल्हा बँक ही मराठवाड्यात अग्रगण्य बँक मानली जाते. या तालुक्यातील गट सचिवांचे ही संस्थेला चांगले सहकार्य असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद मुंडे यांनी केले तर आभार रजाक सय्यद यांनी मानले. यावेळी तालुक्यातील चेअरमन सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!