कै. अशोकराव हाके पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कै अशोकराव हाके पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरची १२ वि सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात बालाघाट संकुलातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश नामदेवराव हाके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा पतसंस्थेच्या उपाध्यक्षा रेखाताई तरडे हाके, संस्थेचे समन्वयक कुलदीप हाके, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अमरदीप हाके, सम्राट चंद्रगुप्त मौर्य स्कूल च्या संचालिका शिवालिका हाके, पतसंस्थेचे सचिव संतोष मुळे, पतसंस्थेच्या कोषाध्यक्षा आशाताई रोडगे, पतसंस्थेचे संचालक परमेश्वर पाटील, लक्ष्मण जेलेवाड, संभाजी दुर्गे, इलियास शेख,कमल राठोड, संजीवनी गुर्मे, संतोष नळगिरे आणि पतसंस्थेचे लिपिक शेषराव हुडगे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मुळे यांनी केले. पतसंस्थेच्या उपाध्यक्ष रेखाताई तरडे, संचालक परमेश्वर पाटील यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले तर पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश हाके यांनी अध्यक्षीय समारोप करताना विविध बाजूंनी मार्गदर्शन करत पतसंस्था वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पतसंस्थेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा ज्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिलानी शेख यांनी केले तर आभार संभाजी दुर्गे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते.
