शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी करून सर्वांनी विनम्र अभिवादन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायकराव जाधव यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, ग्रंथपाल डॉ व्ही एम पवार यांची उपस्थिती होती . प्राचार्य जाधव यांनी पंडित दीनदयाळ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना म्हटले, पंडित दीनदयाळ हे भारतीय स्वयंसेवक संघाचे उपाध्यक्ष व प्रचारक म्हणून कार्यरत होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा मूळ स्थायीभाव होता .
धर्मग्रंथ शास्त्र व पुराणे या माध्यमातून त्यांनी भारतीय माणसाला हिंदुत्ववादी विचार पटवून दिले. त्यांनी आपल्या चिंतन आणि विचारातून एकात्म मानवतावाद हा विचार मांडला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयंती समिती प्रमुख डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी केले . या जयंतीला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
