सचिन घोळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक भागवतराव घोळवे यांचे चिरंजीव प्रा. डॉ. सचिन घोळवे यांना इंडो मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मानाचा एपीपी महाराष्ट्र आणि मलेशियन आंतरराष्ट्रीय शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला,हा पुरस्कार बी एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसी अंबाजोगाई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा.डॉ. सचिन घोळवे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
