राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना देश पातळीवरील सहकार नेत्रुत्व पुरस्कार प्रदान

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना देश पातळीवरील सहकार नेत्रुत्व पुरस्कार प्रदान

पुरस्काराची मिळालेली १ लाख रुपये रक्कम व स्वतः चे ४ लाख रुपये असे ५ लाख रुपये माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी संगमनेर येथील मूकबधिर शाळेला दिली देणगी

अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरीतक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रेरणादिनी देण्यात येणारा सहकार क्षेत्रातील मानाचा देशपातळीवरील सहकार नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतजी यांच्या शुभहस्ते व माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शानदार सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. दरम्यान या पुरस्कारात मिळालेले १ लाख रुपये माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी स्वतः चे ४ लाख रुपये घालुन ५ लाख रुपये देणगी संगमनेर येथील आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मूकबधीर शाळेला देण्याचे मनोगतात जाहिर केले आहे दरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी केलेली मदत याबद्दल उपस्थित नागरिकांनी मोठया प्रमाणात स्वागत केले आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंग डोटासारा, राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, इगतपुरी चे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार उल्हास दादा पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहकार क्षेत्रातील मानाचा देशपातळीवरील सहकारातील नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोबत १ लाख रुपये, प्रशस्ती पत्र देवुन सन्मान करण्यात आला.

स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत पर्यावरण तज्ज्ञ साहित्य, समाजसेवा, अभ्यासक तसेच कृषी, शिक्षण,या क्षेत्रात उलेखनिय कामगीरी करणारे थोर विचारवंत डॉ अण्णासाहेब साळुंके याना प्रदान करण्यात आला तर समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्याबद्दल ‘डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ पर्यावरण तज्ञ, वनराईचे विश्वस्त मा. डॉ. सुधीर भोंगळे यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी विजय आण्णा बोराडे, डॉ शिंदे, दिलिप शिंदे, राजेंद्र नागवडे, उदयराज उंडाळकर, सत्यजित तांबे, शोभाताई बछाव, माजी आमदार मोहन जोशी, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, कल्याण काळे, नामदेवराव पवार, माजी आमदार उल्हास पवार प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, हेमलता पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक राजकुमार पाटील, संचालक अनूप शेळके, काँग्रेस मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष पत्रकार हरिराम कुलकर्णी, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, सचिन गुजर, इंद्रजित थोरात, माधवराव देशमुख, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, वडगांव सोसायटी चे चेअरमन सतीश पाटील, संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास पवार, विजय कदम, प्रभाकर बंडगर सगरे गुरुजी विविध संस्थांचे प्रतिनिधी व राज्यातील, कृषी, साखर कारखाना, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!