राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिन साजरा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगिले) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 28 वा वर्धापनदिन राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने विविध उपक्रमाने उदगीर येथे साजरा करण्यात आला. ही सामाजिक संघटना असून मागील 28 वर्षापासून संघटनेचे संस्थापक तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक व समाजातील इतर मागास घटकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या यशस्वी लढ्यामुळे आज देशपातळीवर काम करत आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मधुकर वाघमारे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राम पंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्रशाला निडेबन येथे वृक्षारोपण व राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज यांचे जीवन चरित्र पुस्तके वाटप करण्यात आले. तसेच शहरातील बेघर झालेले गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला.

यावेळी नवनाथ गायकवाड, उपसरपंच अत्तर फैय्याज, सदस्य मणियार फसी, ग्राम विकास अधिकारी बिरादार बी.जी., मुख्याध्यापिका पाटील एम. एस, संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा आयोजक मधुकर वाघमारे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.उर्मिला वाघमारे, शिवाजी गायकवाड, शेख इजहार, मनोज मनदुमले, सिद्धार्थ सोमवंशी, शेखर अनंतवाळ, चंद्रकांत सोमवंशी, सौ. रुक्मिणी शिंदे, सौ.जयश्री टिळेकर, सौ.बबीता वाघमारे, सौ.जयश्री वेताळ, पंडितराव सूर्यवंशी, गंगाधर गिरगावकर, गोपाळ सूर्यवंशी, सुनील गायकवाड, माधव कल्याणकर, बालाजी माने, धनंजय लोहकरे, सुनील दामेवाले, दशरथ लोहकरे यांच्यासह संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!