नरेंद्र मोदी यांच्या सेवाभाव वृतीमुळे संबंध देशांमध्ये सामाजिक कार्य व्यापक झाले – राहुल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवाडा मोहीम राबवत असून याच अनुसंगाने हंगरगा येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी गावातील सामाजिक, राजकीय लोकांनी एकत्र येऊन संपूर्ण गाव, मंदिर, मज्जित, बौद्ध विहार, अण्णाभाऊ साठे चौक व सामाजिक परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना राहुल केंद्रे म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून आज सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला स्वच्छतेची जानीव निर्माण झाली आहे. याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टीने 17 सप्टेंबर पासून दोन आक्टोबर तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा अशा माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आपण हंगरगा येथे स्वच्छता मोहीम राबवत असून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल केंद्रे यांनी सांगितले.
देशभर नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्ष अविरतपणे 18 – 20 तास ना. मोदीजी देशाची सेवा करत असून आज सबंध जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पहिल्या पसंती मोदी यांना मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या विकासाची दूरदृष्टी, सबका साथ सबका विकास या अनुषंगाने मोदी सरकार काम करत आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून मोदी यांनी योजना आखल्या आहेत, त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार व भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. अशा जगप्रिय असणाऱ्या लोकनेत्याचा वाढदिवस सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपण साजरा करावा. असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय मामा पाटील, ऍडव्होकेट भाऊसाहेब जांभळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष इरशाद भाई शेख, गावच्या सरपंच राठोड ताई, उपसरपंच दयानंद सूर्यवंशी, नानासाहेब माने, सत्तार भाई पठाण, अकबर पठाण, गुणवंतराव माने, प्रदीप सूर्यवंशी, संजीव पाटील यांच्यासह गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
