जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संस्कृती गार्डन, अहमदपूर येथे जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. ता.अहमदपूर ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभेत 2021-22 वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देत कर्ज मर्यादा 15 लाखावरून 20 लाख करणे व सर्वसाधारण संचालक संख्या 8 वरून 10 करणे तसेच ठेव व्याज व कर्जवाटप व्याज या 0.5% फरक ठेवणे, जीवन हमी योजनेस मान्यता देण्याबाबत आदी महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. प्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, नीट मध्ये यश मिळवलेले विद्यार्थी व शिक्षक पालक, स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील साहेब ,गणेशदादा हाके पाटील, माजी सभापती भारतभाऊ चामे, बळीरामजी भिंगोले सर, जिल्हापरिषद सदस्य माधवराव जाधव, उपसभापती बालाजीराव गुट्टे, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था म.अहमदपूर चेअरमन यशवंतराव मुंडकर सर, उपाध्यक्ष विलासराव आगलावे सर, सोनटक्के महादेवीताई, शादुलजी शेख सर, नंदकुमारजी कोनाळे, संचालक रणजीत चौधरी, व्यंकुराम उगिले, रजनीकांत जाधव, वाल्मीक पंदे, वसंत भोसले, गोपाळराव गुट्टे, शशिकांत गायकवाड, महादेव होनराव, प्रकाश भालेराव, नंदकुमार कोनाले, वरिष्ठ सहाय्यक गिरीश तोंडारे, कनिष्ठ सहाय्यक वेदांत राठोड, हरिदास ढेले, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!