शारदोत्सवानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

शारदोत्सवानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे शारदोत्सवानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.सर्वप्रथम शारदा माता व महर्षी योगी अरविंद यांच्या प्रतिमा पूजनाने शारदोत्सवाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी बोलताना अश्विनी देशमुख यांनी नवरात्रीचे महत्त्व सांगत आदिशक्तीचे महत्त्व विशद केले. अनेक कथा सांगितल्या.

अध्यक्षीय मनोगतात कांचन पतंगे यांनी स्त्री- शक्तीचे महत्त्व सांगत घरोघरी ज्योती स्वरूप स्त्रिया घर प्रकाशित करत असल्याचे सांगितले. विद्यालयाच्या वतीने कर्तृत्ववान महिला म्हणून संस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अश्विनी देशमुख यांचा व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता समर्थपणे वाटचाल करत,स्वतःच्या मुलांना घडवणाऱ्या कांचन पतंगे या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख विनायक इंगळे,ज्ञानोपासक मंडळ प्रमुख अनिता मुळखेडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता मुळखेडे व नीता मोरे यांनी मेहनत घेतली. संचलन मयुरी वट्टमवार,प्रास्ताविक संध्या बोडके, स्वागत व परिचय नीता मोरे, गीत श्रीया महामुनी,शरयू पांचाळ, अक्षरा दुरुगकर तर आभार श्रीया महामुनी यांनी मानले.

या प्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,कार्यवाह तथा केंद्रीय सदस्य शंकरराव लासूने,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हूरदळे, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, ज्ञानोपासक मंडळ प्रमुख आशा कल्पे यांनी शुभेच्छा दिल्या

About The Author

error: Content is protected !!