अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती राष्ट्रीय अंत्योदय दिन म्हणून साजरी करण्यात आली.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते. तर, अहमदपूर शहरातील प्रसिद्ध संगीत विशारद आर. व्ही. सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे,डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, वामन मलकापूरे, भूषण सोनकांबळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!